इरसालपणा ही पुणेकरांचीच मक्तेदारी नाही. ग्रामीण पार्श्वभूमीवर विनोदी
लिखाणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या मिरासदारांच्या कथेतील एक किस्सा आठवतो तो
असा-
कथेंत एका कोर्टकेसमध्ये एक वकील महाशय एका साक्षीदाराची उलट
तपासणी घेत असतात. साक्ष देतांना साक्षीदार कुणीतरी कुणाचा तरी "अधल्याचा
भाऊ" आहे असे सांंगतो. वकील महाशयांनी असे नाते पूर्वी कधी
ऐकलेले नसल्यामुळे ते साक्षीदाराला अधल्याचा भाऊ म्हणजे काय ते
विचारतात. साक्षीदाराला त्यांत न समजण्यासारखे काय आहे ते समजत नाही.
म्हणून तो गडबडतो. त्यामुळे वकीलाला संशय येतो व ते त्याचा अर्थ उदाहरण
देऊन सांगण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा साक्षीदार सांगतो, "समजा वकीलसाहेब
तुम्ही मेलात, अन तुमच्या बायकोने माझ्याशी पाट लावला आणि तिला
माझ्यापासून मुलगा झाला तर तो आणि तुमचा आत्ताचा मुल्गा हे अधल्याचे भाऊ
होतात".