संगणकाच्या उपयोगामुळे सुवाच्य आणि सुंदर अक्षराचे महत्व थोडेफार कमी झालेले असले तरी सुंदर अक्षर काढतांना मनाला आनंद झाल्याखेरीज राहत नाही.
या विषयाला लक्षात ठेवुन मुबंईचे यशवंत कोले यांनी मराठी विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यशाळांचे आयोजन केलेले आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि या प्रयोगाच्या निष्कर्षातुन " असे सुधारा अक्षर" नांवाच्या ४ पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत.
पुस्तिका प्राथमिक शालेच्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असुन अनेक छोट्या छोट्या गोष्टी- कवीता मधुन अक्षर कसे सुधारावे याचे धडे दिलेले आहे.
पुर्ण संच ५० रुपयात मिळतो, अर्थातच त्या साठी त्यांच्याकडे प्रत्यक्ष माहिती विचारली तर बरे होईल.
इच्छुक लोकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
यशवंत कोले, B, ३०१, पंचगंगा को. हॉ.सोसायटी, पुष्पापार्क, मालाड पुर्व, मु. ९७.
दुरध्वनी - ०२२-२८४४०८९७ आणि भ्रमण- ९८२१६८१४८९.

वाढदिवससाठी, मुलांच्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी अशा उपक्रमांना साह्य करणे आपले कर्तव्यच आहे ना!!!.

द्वारकानाथ.
( सदर्भ - महाराष्ट्र टाईम्स चे शेक्षणिक सदर आणि श्री. कोलेयाच्यांशी चर्चा)