कदाचित हे सगळे भाषंतर अधिक सहज होऊ शकेल हे एकदम माअन्य पण
'''आम्ही ओढयाच्या बरेच पुढे आलो होतो' किंवा 'आता ओढा मागे राहिला होता. ' ही वाक्ये आम्ही ओढा मागे टाकला या वाक्याइतकीच सरळ आहेत. शिवाय एका अप्रतिम भाषांतरात मी अशा तऱ्हेचे भाषांतर वाचले आहे. अर्थात हा प्रयत्न पूर्णपणे माझा आहे त्यामुळे तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे, पण ती या ठिकाणी मला योग्य वाटली नाही.
"च् च् आपण यापेक्षा वाईट गोष्टी सोडवल्या आहेत." यापेक्षा
"आपण दोघांनी यापेक्षा अधिक गुंतागुंतीच्या (किचकट) गोष्टींचा छडा लावला आहे."
या दोन्हीतले कोणते वाक्य बोलीभाषेच्या अंगाने जाते बरे? मला तरी पहिले वाक्य जास्त बोलीभाषेच्या अंगाने जाते असे वाटते. जिथे लगेच कृती करायला हवी अशी वेळ समोर असताना माणसे लहान वाक्ये बोलतात असा माझा अनुभव आहे. या संदर्भात एक उदाहरण द्यायचे झाले तर हॅरी पॉटर च्या एका चित्रपटात एक पात्र एक मोठा आणि किचकट मंत्र म्हणताना दाखवलं आहे. हा प्रसंग पाहून लेखिका म्हणाली की तुम्ही दाखवलेला मंत्र अतिशय संकटाच्या परिस्थितीत वापरायचा आहे पण तो तुम्ही इतका अवघड आणि लांबच्या लांब दाखवला आहे की तो मंत्र म्हणून होण्यापूर्वीच शत्रूचा वार त्या मंत्र म्हणणाऱ्यावर झाला असेल.
असो. सूचनेबद्दल आभार.
तिसरी गोष्ट म्झणजे प्रचिती. हा शब्द प्रचिती असाच बरोबर आहे. शुद्धिचिकित्स्दकाची यात काहीच चूक नाही. चित्त या शब्दापासून प्रचिती शब्द तयार झाला आहे. त्यामुळे मूळ चित्त शब्दात चि ऱ्हस्व असल्यामुळे प्रचितीमधेही तो ऱ्ह्स्वच असायला हवा.
बघा पटतंय का ते.
जाता जाता : नजरचुकीने एक वाक्य दोनदा आले अहे ते काढून टाकायचे राहिले याबद्दल क्षमा असावी.
--अदिती