माझे मत आहे कि , सांप्रतची जी स्थिती झाली आहे तिचे कर्ते करवितेच
एकमेकांशी भांडत आहेत. कारण एकच ' मराठी माणसांचा एकमुखी पाठिंबा'. पण हा पाठिंबा म्हणजे एक जहागिरीच असून त्या जहागिरीवरती हक्क सांगणे, ती बळकावणे हे प्रकार चालू आहेत. त्या मुळे एक निवडणूक हरली कि मगच सगळे जण ताळयावर येतील . यात दुर्दैवाने आपण मराठी माणसं मात्र मुंबई घालवून बसू अशी एक रास्त भीती वाटते, पण काय करणार? दुसरा कोणीही दिसत नाही . त्यामुळेच यांच्यापैकी कुणाला तरी मत द्यावेच लागणार!!!
मुंबईमध्ये मराठी माणूस जर टिकायचा असेल तर हिंदूत्वाला पर्याय नाही कारण अमराठी लोकांची संख्या आपल्यापेक्षा बरीच जास्त असल्यामुळे त्यांची मते मिळवणे क्रमप्राप्तच आहे. हे काम भा ज पा करतयं. मराठी लोकांची मते सध्या सेना करतीय. यांची गोळाबेरीज म्हणून मराठी लोकांची मुंबईत थोडीतरी चलती आहे. त्यामुळे भाजपा + सेनेला पर्याय नाही.
उद्या मनसे ला जर मराठी लोकांचा पाठिंबा मिळाला तर भाजपा + मनसे अशी युती होईल. (हा बदल व्हावा म्हणूनच ही मारामारी आहे).
प्रसाद.