श्री ओक,

मनोगतासारखे मराठी इतर संकेतस्थळांवर लिहीता येणे शक्य आहे का? ते सुद्धा मनोगतासारखा सशुल्क संपाद्क न वापरता?

काही मनोगती या प्रयत्नात आहेत. असा काही प्रकार तुम्हाला माहिती आहे  का? नीलहंसांचा गमभन हा उत्तम आहे. पण त्यात त्यांनी संपुर्ण स्क्रिप्ट दिली आहे. जेणे करुन जाल जोडनी नसतांनाही तो संपादक वापरता यावा. पण इतर ड्रुपल संकेतस्थळांसाठी सर्व्हरवर स्क्रिप्ट ठेवून काम करणे असा मनोगताचा जो प्रकार आहे ना , असा काहीसा जमायला हवा.

या बाबत एक ग्रुप काम करतोय.

http://sourceforge.net/projects/entrans/  हा त्यांचा पत्ता, येथे इंडीक वेब इनपुट नावाचा प्रकल्प आहे.

पण यात मनोगतासारखं (Ctrl+t) उपलब्ध नाही. आणि याचा कळफलक वेगळाच येतो. कुणी जाणकार जर का ह्या तृटी दूर करु शकले तर हा प्रकल्प मोफत उपलब्ध आहे.

तसेच ह्या संचिका आपल्या ड्रुपल मधे कश्या चढवायच्या याचे मार्गदर्शन केले तर बरे होईल.

धन्यवाद