श्री पाला पाचोळा,

तुमचं लिखाण आपल्याला मनापासून आवडलं.

आजचा विद्रोही उद्याचा प्रस्थापित असतो.किनाऱ्याची नौका कालांतराने मुख्य प्रवाहात येतेच. ती मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागत असेल तर त्याचा अर्थ पाणी कुठेतरी साचलं आहे. साचलेल्या पाण्याला वाट करून द्या ते पुन्हा धावायला लागेल.

उत्तम !

पण हा प्लुटो उल्लेख मुद्दामच नाही समजला. असो. प्रत्येकजण आपापल्या जागेवर ठाम आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. त्याची पातळी खालावू नये अशी माझी प्रार्थना.

श्री विकी,

बहुजन ही संकल्पना शाहू फुलेंच्या काळात जन्माला आलेली आहे. विशेषतः वेदमंत्रांचा वाद झाला तेंव्हा. तेंव्हापासून तथाकथित उच्चवर्णीय सोडलेतर बाकी सारे बहुजन. असा काहीसा प्रकार झालेला आहे. खरं तर या सर्वांत एकोप्याची भावना रुजवण्यासाठी हे तथाकथित उच्चवर्णीयच कारणीभूत ठरलेत. या विषयावर आणखी चर्चा झाल्यास स्वागत आहे. मात्र मला कुणालाही प्लुटोवर किंवा इतर कुठल्याही ग्रहावर जाण्यापासून रोखायचे ही नाही आणि जाण्याकरिता प्रवृत्तसुद्धा करायचे नाही. मुळात माझी माय वसुंधरा सोडून कुठे काही आहे याची मला जाण सुद्धा नाही.

नीलकांत