वैभव,
गझल सुंदर आहे. सारे शेर आवडले. त्यातही मला
आश्चर्य काय ह्यांचे प्रतिबिंब स्वच्छ नाही
बघतात माणसे ही पाण्यात माणसांना
घेण्यास श्वास थोडी जागा हवी जिवाला
बांधायचे कशाला नात्यात माणसांना ?
हे दोन फारच आवडले. मनोगतावर सामाजिक आशयाच्या गझला जरा कमीच येतात. त्यामुळे गझलेस केवळ प्रेम-प्रेयसी-प्रेमभंग हेच विषय चालतात ह्या गैरसमजास नकळत पुष्टी मिळत जाते. म्हणूनच तुमची ही अप्रतिम गझल व त्यास मिळालेले इतके सारे सकारात्मक अभिप्राय वाचून अधिक आनंद झाला.