श्री. लिखाळ यांचा मनांत जे विचार आले त्याच्याशी मीही सहमत आहे.
प्रस्थापित विचारांचा आपल्या मनावरील पगडा दूर करण्याचा प्रयत्न करणारी आणखी एक कथा मला आठवते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहीलेल्या
' मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव ' या शीर्षकाच्या कथेत एका रूपका द्वारें त्यांनी कर्म-कांडावर टीका केलेली आहे. ती थोडक्यात आशी -
एक देवभोळा पांथस्थ रोजच्या पूजाअर्चेत खंड पडूं नये म्हणून देवाच्या मूर्ती एका संपुटांत घेऊन फिरत असतो. एके सायंकाळी हात-पाय धुण्यासाठी पाणी काढण्याच्या नादांत तें संपुट विहेरीत पडते आणि आतां नित्य अर्चनेत खंड पडणार म्हणून तो दु:खी होतो आणि विमनस्कपणें रात्रभर तिथेच विहीरी जवळ बसून राहतो. उष:काली त्याचे लक्ष चमकणाऱ्या तारांगणाकडें जातें आणि तो हरखूनच जातो. प्रत्यक्ष देवदर्शनापेक्षाही अनुभूतीचा त्याला भास होतो आणि त्याला खरा विश्वाचा देव सापडतो.
ही कथा वाचल्यानंतर माझीही देवकल्पना अधिक सजग झाली असावी. (असावी अशा करतां की, अजूनही मी सत्यनारायणची नैमित्तिक पूजा घालतोच)