असा अभंग आहे. पूर्ण अभंग शोधण्याचा प्रयत्न केला. पण मिळाला नाही. हा अभंग एकनाथ महाराजांचा नसावा. कारण एकनाथ महाराजांना "एका जनार्दनी" असे लिहिण्याची सवय होती. "नाथाघरची उलटी खूण । पाण्याला लागली तहान" अशी ओवी आहे.

ह्याचा अर्थ असा आहे की, आपण तत्त्वतः आनंदस्वरूप आहोत, सुखस्वरूप आहोत. पण आपण सुखासाठी, आनंदासाठी बाहेर शोध घेत फिरत राहतो. आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो हे ठीक आहे. पण पाण्यालाच तहान लागली असे कधी घडते का? पण नेमके हेच आपल्याठायी घडले आहे. आपण सुखस्वरूप, आनंदस्वरूप असूनही आपण आनंदासाठी तहानलेलो आहोत असे सुचवायचे आहे.

दुसराही अशाच अर्थाचा अभंग आहे. त्यात म्हटले आहे की पाण्यात राहणारा मासा पाणी कसे पीत असेल आणि का पीत असेल?

बघा पटते का.