जर पहिल्या संन्याशाला दुसऱ्या संनाश्यास एखादी गोष्ट पटवून द्यायची असती तर त्याने आधीच 'बाबा रे तुला कसली काळजी वाटते?' म्हणून विचारावयास हवे होते.

या गोष्टीतला दुसरा संन्याशी हा प्रामाणिक वाटतो. पहिल्या संन्याशाने त्याला हा प्रश्न केला असता तो त्याचे सरळ उत्तर देतो. यावरून पहिल्या संन्याशाला आपल्या संन्यासी असण्याचा गर्व झाला असावा व त्या गर्वात त्याने दुसऱ्या संन्याशाचे नुकसान केले.

सोन्याचा संचय करणे ही जर दुसऱ्या संन्याशाची चूक असेल तर दुसऱ्याचे सोने न सांगता सवरता फेकून देणे हे ही चूकच आहे. याउलट पहिल्या संन्याशाने दुसऱ्या संन्याशाला आपले म्हणणे पटवून त्यालाच स्वतःच्या हस्ते सोन्याची विल्हेवाट लावायला सांगणे अधिक शोभादायी होते.

मी काढलेले तात्पर्य:

संन्यस्त जीवन जगायचे ठरवले म्हणून सारासार विवेक बुद्धी येईलच असे नाही.