कविता प्रखर नि रोखठोक आहे. वास्तवाचे असे चटके देणाऱ्या कविता गोडगुलाबी लुसलुशीत शब्दांत मांडता न आल्याने बरेचदा अगोडही वाटून जातात. असो.

सोसण्या आयुष्य थोडें सोसुनी घ्यावें हंसू
                   त्या विषासाठीं विषाचा हा उतारा वेगळा

नेहमींच्या यातनांची कैद ही नाहीं खरी
मात्र मेलेल्या मनाचा कोंडमारा वेगळा

या दोन द्विपदी विशेष आवडल्या. तिसरी द्विपदी नीटशी कळली नाही. उदेला म्हणजे काय? हा शब्द 'उदी' म्हणजे विभूती/पवित्र अंगारा यावरून आलाय का? (तसे असल्यास 'उदीला' हवे) या द्विपदीचा अर्थही नीटसा स्पष्ट झाला नाही.

पहिली द्विपदी वगळता इतरत्र अलामत निभावली न गेल्याने गझल होऊ शकली नाही, असे वाटते.