टिचकीमुळे चहाच्या केवळ पृष्ठभागावर तरंग उमटले म्हणून त्या लाटांना उथळ पाण्यातील लाटा म्हणणे सयुक्तिक होणार नाही का? तसेच जेव्हा संपूर्ण स्तंभ हादरतो त्याला खोल पाण्यातील लाटा म्हणणे योग्य नाही का?
---------- हम्म... लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने हे सोपे ठरेलही. मात्र खो. पा. आणि उ. पा. लाटांची व्याख्या ही पाण्याची खोली आणि तरंगलांबी ह्यांच्या गुणोत्तरावर आधारित केलेली असल्यामुळे त्यांचे तसेच अर्थ घ्यावे लागतील. तरंगलांबीच्या तुलनेत पाण्याची खोली खूप जास्त असेल तर त्या खोल पाण्यातील लाटा आणि तरंगलांबीच्या तुलनेत पाण्याची खोली फारशी नसेल तर त्या उथळ पाण्यातील लाटा असा विचार केला की ह्या व्याख्या सयुक्तिक वाटतील.