आपण जर भारतातून बोलत असाल तर योग्य समाजसेवी संस्था पहा ज्या याबाबतीत कार्यान्वित आहेत.

मधे बॉस्टन/एमआयटी मधे एका कार्यक्रमात दोन संस्था ज्या भारतात वेगवेगळ्या मुलांसाठी काम करत आहेत त्यांचे "प्रेझेंटेशन" पाहीले. एक होती "एकल विद्यालय" जी वनवासी/आदीवासी भागात मुलांसाठी शाळ चालवते. दुसरी होती "प्रथम" जी मुंबई आणि इतर शहरी भागात झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवते.

दोन्ही प्रकार (मॉडेल्स) चांगली आणि बरेच काम यशस्वी करणारी वाटली. असे बरेच जण / बऱ्याच संस्था असतात, आपल्याला फक्त माहीती करून आपल्याला शक्य ती मदत करायची तयारी असणे महत्त्वाचे - मदत काहीही असू शकते पैशाची किंवा त्यांच्याबरोबर काम करायची.