खरेतर लालित्य दाखवण्याचे आम्हाला कारण नव्हते,आमच्या अल्पबुद्धीस आमच्या लेखनाचे काही वेगळे अर्थ निघतात हे वेळेत लक्षात आले नाही या बद्दल क्षमस्व.

 आणि 'अधिक स्पष्ट भूमिका' असे शीर्षक देऊन पुन्हा लिहिण्याची वेळ येणे चांगल्या लेखनाचे लक्षण नाही तरी पण आमच्या भाषा लालित्याचे कौतुका बद्दल धन्यवाद.

अधिक स्पष्ट भूमिका:

विद्रोही साहित्यात सांगितलेला इतिहास खरा आहे?

आमचे उत्तर होकारार्थी आहे. आम्ही समाज सुधारक नाही ,परंतु कृती आणि विचारांनी  समाज सुधारकांच्या समर्थकांच्या पंक्तीत  बसतो.

विद्रोही साहित्याने बहुजन समाज शहाणा होईल का ?

होय आम्हालाही असे वाटते.

विद्रोही साहित्य संमेलनात एका विशिष्ट समाजाला लक्ष केल जात. अस का?

इथे प्रस्ताव कर्त्यांनी अधिक स्पष्ट लिहिले असते तर अधिक सुस्पष्ट भूमिका मांडता आली असती.प्रश्नाचा रोख त्या 'अव्यक्त समाजाला' आत्मपरीक्षण करावयास सांगणारा आहे का ? की, असे लक्ष्य करू नये म्हणणारा आहे .त्या तत्कथीत समाजाला फक्त इतिहासातील चुका करिता जबाबदार धरतो का वर्तमानही चुकीचे गृहीत धरतो ?; हा प्रश्न तथाकथित  उच्चवर्णीयांस उद्देशून असेल  तर उच्चवर्णीयात राजकीय वर्तमान ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पदरी नेमके कोणते माप घालतो ?

आमची स्वतःची भूमिका 'इतिहास आणि वर्तमानाची मापे वेगळी असावीत आणि ज्याचे त्याचे माप, ज्याच्या त्याच्या पदरी असावे'.

लोकशाहीतही न्यायाधीश कोण ते सत्ताधारीच ठरवतात  त्यामुळे कौल कसाही पडला तरी तो न्याय स्विकारण्या शिवाय गत्यंतर नसते.

अशा साहित्याची अथवा संमेलनाची गरज आहे का ?

हो तशी असते आम्हाला मान्य आहे.

* आम्ही आधी केलेल्या लेखनातील 'बहुसंख्य' हा शब्द सर्व मानवां बद्दल आहे.प्लुटोचा उल्लेख नाहक  पदरी येणाऱ्या मापा बद्दल आहे त्यात वस्तुस्थितीला धरून असलेल्या जबाबदाऱ्या टाळण्याचा किंवा घडल्या चुकांना पाठीशी घालण्याचा काडीमात्रही उद्देश नाही.तसेच कुणाच्या भावनाहि दुखावण्याचा आमचा मनोदय नाही.  असे घडले असेल तर बिनशर्त क्षमस्व.

चु.भु.दे̱̱. घे. हलकेच घेणे

क. लो. अ.

-पा.पा.