अरुणजी,
चित्त यांच्या प्रतिसादावरून ही भटांची गझल आहे असं दिसतंय. तसं असल्यास आपण ह्या गोष्टीचा प्रथम (लिहिली तेव्हाच) उल्लेख करायला हवा होता.

अलामतबद्दल--
मी असं ऐकून आहे (जाणकारांनी चुकीची दुरुस्ती करावी) की पहिल्या शेरात (मतल्यात) एखादी गोष्ट स्पष्ट होत नसेल, (उदा. अलामत तोडणं भाग असेल), तर ते लगेच दुसऱ्या शेरात करावं तर, दुसऱ्या शेरातून गझलेचं चलन स्पष्ट होतं.
वरील गझलेच्या दुसऱ्या शेरात 'निखारा' असल्यामुळे 'अलामत' पाळली जाणार नाही हे स्पष्ट होतं आणि तरीही ही 'गझल' म्हणता येऊ शकते, असं मला वाटतं.

- कुमार