'स्वतःचा व्यवसाय' असा उत्पन्नाचा स्रोत सांगणार्‍या/रीकडे मराठी मन संशयाने बघते. एकतर धंदा बुडित जाणार म्हणून किंवा चांगला चालला असेल तर नक्की काहीतरी अनैतिक चालले असणार असे म्हणून. धंदा यशस्वी करायचा तर खूप काम करावे, खूप पैसा कमावावा असा काहीसा दृष्टिकोन असावा लागतो. खूप पैसेवाल्या कुटुंबांकडे आजही आपल्या इथे संशयाने पाहिले जाते. पैसा कमाविणे हे आयुष्यातले महत्वाचे उद्दिष्ट असणे हे चांगले समजले जात नाही. एका अर्थाने धंदेवाईकपणाला आणि मूलतः पैशाला मोठी प्रतिष्ठा नाही. तशी ती कलेला, सेवेला, बुद्धीला आहे. म्हणून मराठी लोक त्या त्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. मला वाटते जसजशी पैशाला प्रतिष्ठा प्राप्त होईल धंदेवाईक वृत्ती आपोआप येईल.