"मी परगावाहून पुण्यात आलो आहे.  अचानक आजीची तब्येत बिघडली. काकाल 'काँटॅक्ट' करण्याचा प्रयत्न करतोय. पण 'ट्रेस' होत नाही. मला लातूरला जायला १५० रुपये हवे आहेत," असे म्हणून एकाने मला ऑफिसजवळ पैसे मागितले. तो आपल्या आजीला चौकात बसवून उभा होता. त्याच्या आजीची तब्येत फारच डामा़डौल वाटत होती. असो. मला शंका आली आणि मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पुढे गेलो. वाईट वाटले आणि परतलो.  आणि "जपता येणार नव्हते तर आणले कशाला म्हातारीला" असे त्याला सुनावले आणि पैसे काढून त्याला दिले. असो.

थोड्या वेळ्याने मी माझ्या मित्रासोबत फिरत असताना दुसऱ्या एका चौकात मला तो आपल्या आजीसोबत दिसला. असो.

पैश्याची मदत मागणारे, भीक मागणारे बरेचदा खोटं बोलवून फसवतात. म्हणून मदत करणे बंद करू नये. मदत करायची असल्यास रोख मदत न करता 'काइंड'मध्ये करावी. तिकिटासाठी पैसे मागितले तर तिकीट काढून द्यावे. जेवणासाठी पैसे मागितले असल्यास जेवण विकत घेऊन द्यावे, जेवणाचे पैसे भरावे.

ह्या शिवाय अनेक संस्था आहेत त्यांना मदत करावी.

चित्तरंजन