श्री. जावडेकरांचे बरोबर आहे. ही कविता (गझल) माझी नाही.
पण ती सुरेश भटांचीही नसावी. आवडलेल्या कविता लिहून ठेवण्याची माझी जुनी संवय. साधारणतः १९७४ च्या सुमारास ही कविता माझ्या वहीत लिहीली गेली ती वही आज बरीच जीर्ण-शीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे मूळ कवीचे नांव सांगणे कठीण आहे.
खरं तर आता हा खुलासाही अनाठायीच आहे. मी सहसा - कांही अपवाद वगळता - मनोगतवर संग्रहित कविता दिलेल्या आहेत आणि तसा उल्लेख करण्यास चुकलोही नाही. ही कविता देतांनाच हें नमूद करावयास हवे होते. अनवधानाने झालेल्या या चुकीबद्धल मी दिलगीर आहे. क्षमस्व!