दोन्ही जागेवर शिव्याच मग फरक काय? माझ्यामते एका जागेवर शिव्या दिल्या गेल्या त्या एका दुसऱ्या वर्गाला कमीपणा देण्यासाठी  आणि आता शिव्या दिल्या जात आहेत त्या आपल्या दबलेल्या लोकांच्या मनात आत्मविश्वास जागवण्यासाठी. मग माझा या विद्रोही साहित्याला असलेला विरोध गळून पडतो.

मी या शिव्याशापांचा समर्थक नाही, पण त्या साहित्याला विरोधसुद्धा करवत नाही. आत्मविश्वास जागवण्याचं काम चालत राहिलं पाहिजे असं माझं मत. पण त्या स्वरूप आणखी जास्त विधायक व्हावं ही आजच्या मंगल दिवसाला अपेक्षा.

ज्याचा विरोध करायला हवा त्याचा विरोध कोणत्याही कारणास्तव बाजूला न ठेवता करायलाच हवा. मनुस्मृती चा विरोध म्हणून प्रति-मनुस्मृती लिहली जात असेल तर ते वेळीच थांबवायला हवे. असल्या विरोध न होण्याच्या मानसिकतेतून समानता तर येणार नाहीच फक्त टेबलाच्या एका बाजूला बसलेले दुसऱ्याबाजूला जातील आणि दुसऱ्याबाजूचे पहील्या बाजूला. दुसरे असे की आधीच आत्मविश्वास जागलेलाच नाहीये का? मला वाटत आत्मविश्वास पूर्णपणे जागला आहे किंबहूना 'उपरा', 'कोलट्याचे पोर' मधून तो दिसत आहे पण याच वेळी मा. म. आणि पुरुषोत्तम खेडेकरांच्या लिखाणातून तो आत्मविश्वास हद्द पार करून 'माज' या सदरात मोडू लागला आहे.