फटाक्यांच्या आवाजाने लहान मुले, म्हातारी माणसे आणि घरातल्या इतर माणसांनाही आवाजाचा त्रास होतो. विशेषतः ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांची झोप तर अशा आवाजांमुळे साफ उडत असावी. त्यामुळे हे ध्वनिप्रदूषणही आहे. शहरांतल्या बऱ्याचशा इमारतीतील अपुऱ्या जागांमुळे फटाके उडून घरात येण्याचे प्रकार घडतात. तसेच या फटाक्यांचा अतिशय कचरा होतो, फटाके उडवणारे हा कचरा साफ करण्याची तसदी कधी घेतात असे वाटत नाही.

यावर उपाय म्हणजे सार्वजनिक दिवाळी साजरी करावी, बिनआवाजाचे फटाके उडवावेत व हवेत उंच जाणारे फटाके उडवावेत जे हवेतच जळून जातील व कचरा कमी होईल.