मित्रहो, कळविण्यास अत्यंत दु:ख होते की बाळकृष्ण ते नतद्रष्ट कार्ट हा प्रवास केवळ चारच दिवसांत झाला.
झकास.  हे बाळकृष्णांसारखेच इतरांनादेखील लागू होते. असो.

संभाजी पार्कात भेळ खाणार आणि भीमथडीच्या तट्टाणांना यमुनेचे पाणी पाजण्याच्या गप्पा फडके हौदापाशी करणार !
हाहाहाहाहहा:) वा:) कालच फडके हौदापासच्या वैद्याकडे थालिपीठ खाल्ले.

फारच मस्त. बालगीतांची पुनर्रचना आणि तदानुषंगिक विचारमंथनास गहिऱ्या, आशयगर्भ, प्रत्ययकारी विनोदाचा मुलामा आहे. (असं काही नसतं.  असं म्हणायचं असतं.) साध्या शब्दांत, अभिजीतराव हा लेख खूप आवडला.