समशेर,

सर्वात आधी तर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

नव्या धाटणीत बनवलेले किल्ले खूपच आवडले. पूर्ण नीट तपशिलवार - चित्रांसकट बनवण्याची पद्धत सांगितल्याने करूनही बघता येतील.

किल्ला पाहून आजोबा म्हणले, "अरे तो ससा पडला आहे. त्याला निट उभा ठेव." तर मनू म्हणला "नाही आबा! तो झोप्ला आहे, आणि काशव जिंक्ले."

या सुंदर ओळी वाचून तर मी आत्ताच घरी जाऊन पोहोचले आहे. अजून तीन दिवस जायचेत घरी जायला. आता दिवसांचा काउंटडाऊन तासांवर येऊन ठेपला आहे.. मग मिनिटांवर येईल आणि मग सेकंदांवर.. आणि मग या तीन दिवसांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांची वर्षभर पाहिलेली वाट पूर्ण होईल ! तुमच्या या सुंदर लेखामुळे घरी जाण्यापुर्वीचे हे तीन दिवस घालवणे आणखीन असह्य झाले आहे..