काही वर्षांपूर्वी मी आमच्या काही बच्चेलोकांसाठी आवाज न करणारे फटाके विकत घेतले होते. त्यातली पहिली सापगोळी पेटवली. बीभत्स दिसणारा तो  साप गुरगुरत बाहेर आला. धुराचा एक लोट उठला. पाच वर्षाचा माझा भाचा बावरून म्हणाला. 'वा, काय पोल्यूशन आहे!'
त्यानंतर मुलांना कोणत्याही प्रकारचे फटाके विकत घेण्यासाठी मी उत्तेजन देत नाही.
नकारासाठी नकार ही जर विकृती वाटत असेल तर अनाठायी उत्साह हीपण विकृतीच आहे.