ग्रामिण मुम्बईकर,
छान लिहिला आहे अनुभव. इतकं एकरूप होऊन जाऊन एखादी कलाकृती पार पाडत असलो की ती कलाकृती पूर्ण झाल्यावर त्या आठवणींमध्ये मन रेंगाळू इच्छिणार हे तर आलंच.. ते तसं व्हायलाही हवंच ! त्यातली मजा ती काही औरच !
काय करू मी या अभ्यासासाठी?
मला खूप काही अनुभव आहे आणि म्हणून मी काही सांगते आहे अशातला भाग नाही, पण तरीही..
गप्पांमधून छान अभ्यास होऊ शकतो. वर्गातील इतर कोणा अभ्यासू दोस्ताबरोबर बसून अभ्यास करा. एकमेकांना प्रश्न विचारून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपोआप अभ्यास होऊन जाईल आणि झोपही येणार नाही.