पुण्यात माहितीचा अधिकार वापरलेले कोणी आहेत का? असाल तर मला व्य नि पाठवा. तुमच्या ओळखीत कोणी असेल तरी चालेल. मी संपर्क साधेन. मला काही माहिती हवी आहे. आगाऊ धन्यवाद.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली "माहितीचा अधिकार अधिनियम २००५" ही माहिती पुस्तिका जरूर वाचा. सगळीकडे उपलब्ध आहे. किंमत १४० रुपये. सगळी माहिती सोप्या तरीही सुंदर मराठीत समजावून सांगितलेली आहे. या अधिनियमाला बरेच बोचरे दात आहेत असं प्रथमदर्शनी तरी वाटतंय (१. संसदेत जाहीर करण्यायोग्य कोणतीही माहिती सामान्य नागरिकालाही उपलब्ध आहे, २. माहिती गोळा करण्यासाठी वेळेचं निश्चितबंधन आहे. ३. माहिती देण्यासाठी विशिष्ट व्यक्ती जबाबदार ठेवल्या आहेत, आणि प्रसंग आल्यास निरपराधित्व सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे).
माहिती मिळविण्यासाठी नेमके प्रश्न मात्र विचारता आले पाहिजेत.
- कोंबडी