कला/सेवा/बुद्धी आणि पैसा/संपत्ती ह्या दोहोत महत्त्वाचा फरक असा की, कला/सेवा/बुद्धी दुसर्याकडून हिरावून, लुबाडून घेता येत नाही. ज्याच्या जवळ असते, त्याच्यापासून ती कधी दूर जात नाही. दुसर्याला कितीही दिली तरी संचयाचा क्षय होत नाही. कोणीही कितीही संचय केला तरी त्यामुळे दुसर्यास संचय करण्यास अडचण होत नाही.
त्यामुळे कला/सेवा/बुद्धी किंवा पैसा/संपत्ती आपलीशी करावी असे वाटणारी मंडळी वेगवेगळी का असतात त्याचे उत्तर मिळायला मदत होईल.