प्रफ़ुल्लराव,

ही मदत काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या समाजकल्याणखात्यामार्फत मिळते. पण एक मुद्दा असा आहे की पती पत्नी यांपैकी एकतरी अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीतील असले पाहिजे. तसे नसेल तर मदत मिळत नाही.

आकडेवारीसंबंधी --

माझं लग्न आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतर्भाषिय इ.इ. आहे :)

वर उल्लेख केलेल्या नियमाची पूर्तताही होते पण अशा मदतीची गरज वाटत नसल्याने घेतलेली नाही. एखाद्या गरजूला मिळावी ही इच्छा!

                                                       साती