२. अमेरिकेतील राज्ये माहित असणे आणि ओरिसातील जिल्हे माहित नसणे ह्यांचा काय संबंध? समस्त देशातील जिल्हे माहित नसतील तर देशाच्या ऐक्याविषयी बोलणे चूक आहे असा आपला दावा आहे का? तसा असेल तर तो चूक आहे.

घरातील कुटुंबियांमधे भांडणे होतात म्हणून बाहेरुन चोर दरोडेखोर आले आणि त्यांनी चोरी केली तर तक्रार करणे चूक हे आपणाला तर्कशुद्ध वाटते का? मला वाटत नाही.

३. राज्यांना जास्त स्वायत्तता द्यावी असे मला जरुर वाटते. म्हणजे केवळ लोकसंख्येने अती असणारी राज्ये दादागिरी करणार नाहीत. त्यात ही बिमारु राज्ये येतात. त्यांच्या बेजबाबदारीची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. इतर राज्यांना नको.

४. कश्मिरमधे डोकेदुखी असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ३७० कलम ज्यायोगे अन्य राज्यातील कुणाला तिथे जमीन घेता येत नाही वा नवीन धंदे उघडता येत नाहीत. त्यामुळे सतत गरिबी, बेकारी ठाण मांडून बसलेली असते आणि लोकांमधे असंतोष खदखदत असतो. तशात कश्मिरी मुसलमान व अन्य अतिरेकी बांधवांनी तिथल्या पंडितांना हाकलून दिल्यापासून काश्मीरी म्हणजे मुस्लिम असे समीकरण बनले आहे.  ३७०चे बंधन झुगारले तर तो भाग भारतात कधीच सामावून जाईल. पण ते होत नाही. म्हणून कायम सैनिकी बळ वापरावे लागते.

तिथल्या लोकांना वेगळे होण्याचे स्वातंत्र्य दिले तर नागालँड, मणीपूर, आसाम, त्रिपुरा ही मंडळी, कदाचित तमिळनाडूही वेगळे होण्याच्या बाता करु लागेल. त्यांना कसे थांबवायचे? एकदा का ढिले सोडले की मग अंतर्गत यादवी माजायला वेळ लागणार नाही. मग आपापसातल्या सीमा, पाणीतंटे, भाषातंटे ह्यावरुन मोठा रक्तपात होईल. काश्मीरच्या लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्या म्हणणे सोपे आहे पण त्याचे दूरगामी परिणाम भयंकर असू शकतील.
 वसुधैव कुटुंबकम् हे पुस्तकात अगदी छान शोभून दिसते पण ते अत्यंत अव्यवहार्य आहे.

४.