- बंदी घालायची गरज नाही कारण कुणी असले थिल्लर ग्रंथ वाचत नाही आणि फारशी किंमत ही त्यांना देत नाही.
- बाजारात बरेच असे साहित्य उपलब्ध आहे जे बंदी घालायच्या लायकीचे असते. पण ते सर्रास सगळीकडे मिळते. कुठल्याही फूटपाथवरच्या पुस्तक विक्रेत्याकडे असले साहित्य ढीगाने मिळते. जर काही सामाजिक आंदोलन अथवा ओरड झाली तरच शासन असा विचार करते. या ग्रंथांना तेवढी किंमत नसल्याने बंदीचा प्रश्नच उद्भवत नाही.
- आपले राजकारणी काय लायकीचे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. तिथे कर्नाटक मध्ये मराठी भाषिकांना त्रास होतो आहे आणि शासन मूग गिळून गप्प बसले आहे. दिल्ली मध्ये शून्य किंमत असलेले, अजिबात धडाडी नसलेले आणि लांगुलचालनाची सवय लागलेले आपले राजकारणी आणि तसलेच त्यांचे शेळपट शासन!
- शासन बंदी घालत नाही म्हणजे ते ग्रंथ बरोबरच आहेत हे जरा विनोदी वाटते. शासन जे काही करते ते बरोबरच असते असे नव्हे कारण शासन म्हणजे पुन्हा स्वार्थी राजकारणीच!
अर्थात असल्या मूर्खपणामुळे देवतुल्य संत समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत सतत तेवत ठेवणारे निस्पृह श्री दादोजी कोंडदेव यांचे महत्त्व जरा ही कमी होत नाही. असल्या थिल्लर गोष्टींमुळे त्यांचे महत्त्व कमी व्हावे इतक्या त्या लहान व्यक्ती नव्हेत. चार-दोन कुदळीचे घाव घातल्याने लहान-सहान डोंगरांचा आकार कमी होऊ शकतो, हिमालयासारख्या महाकाय पर्वताचा नाही. या दोघाही विभूतींचे चरित्र, वृत्ती, भावना, निष्ठा, देवत्त्व वादातीत आहे. ते तसेच राहणार. असले उद्दाम, घमेंडी आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले खेडेकर आणि अजून कोण कोण (नावे ही आठवत नाहीत यांची आणि हे निघाले सूर्यावर थुंकायला. काय धाडस असते एकेकाचे!) स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. त्यांच्या माकडचेष्टांकडे लक्ष न देणेच श्रेयस्कर!!