बाकीचे फटाके ते इराक/ अफगाणिस्तानात उडवतात का?

वा! काय प्रश्न विचारलाय, मान गये.

बाकी गोळे काका, तुमचा लेख आवडला. मलाही आवाजी फटाके आवडत नाहीत. पण केवळ रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळेही तेवढेच वायुप्रदुषण होते हो. (मनोगतावर तर एक शब्दही न उच्चारता नुसते लिहून बाँब फुटलेले बघितलेत)

दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ग्लोबल वॉर्मिंग, वायुप्रदुषण, कमी होत चाललेला ओझोनचा थर या बाबत आपल्याला जे जे शक्य होईल ते करायला प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे. सुरुवात स्वतःपासून करूया. शक्य तेव्हा खाजगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करावा असे प्रत्येकाने ठरवावे.

एखादा नवा प्रकल्प, उद्योग सुरू होतो विशेषतः रासायनिक तेव्हा त्या कारखान्याने प्रदूषणाला आळा घालण्यासंबंधी योग्य ते उपाय घेतलेत का हे आजूबाजूच्या रहिवाशांनी परखडपणे तपासून घ्यावे.

                                                        साती