ज्वारीच्या पीठाला इरे कमी असल्याने भाकरी थापून झाल्यावर ती मोडू न देता उचलून तव्यावर नीटपणे टाकायला देखील जबरदस्त टॅक्ट लागते ! हात बसेतोवर प्लॅस्टीकच्या कागदावर भाकरी थापून मग प्लॅस्टीकच्या कागदासकट भाकरी उचलून तव्यावर टाकावी आणि मग प्लॅस्टीकचा कागद काढून घ्यावा. कमी इरे असलेली भाकरी हातावर तोलून तव्यावर टाकण्याऐवजी प्लॅस्टीकच्या कागदासारखा भक्कम इरे (!) असलेला मध्यस्थ वापरून त्याच्या सहाय्याने भाकरीला तव्यावर टाकणे तुलनेने सोपे जाते.