साती, प्रतिसादाखातर धन्यवाद.

डासनिर्मूलन, किटकनाशन, अन्नसाठवण इत्यादींसाठी रासायनिक विषद्रव्ये वापरू नयेत असे मला वाटते. तुम्ही काय म्हणता?

वाहने, इंधन, कारखाने इत्यादींमुळे होणारे प्रदूषण आपल्याच विकासासाठी आवश्यक असते. मात्र फटाके, धूम्रपान, डासनिर्मूलन, अगरबत्त्यादी एकूण जैव प्राणवायू ची गरज (बॉयोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड) घटवता येणे किंबहुना नाहिशी करणे शक्य आहे. ह्या दृष्टीने जनप्रबोधन होण्याची नितांत गरज आहे.

सर्किटजी सारख्यांनी ह्या सर्व अनावश्यक आतिषबाज्यांपायी होणारी 'जैव प्राणवायू ची गरज' मूल्यांकित करून आकडेवारी जनतेस समजेलशी सादर करावी. तुम्हाला काय वाटते?