संध्याकाळी घरी यावे. सुस्नात व्हावे. 'तुम अपनी याद भी दिल से भुला जाते तो अच्छा था'  किंवा 'एक मै हूं एक मेरी बेखुदी की शाम है' ची कॅसेट लावावी. सकाळचा उरलेला 'सकाळ' वाचावा. थोडा वेळ 'मनोगत' वर मारामारी करावी. स्वयंपाकघराच्या दिशेने तोंड करून जरा मोठ्याने ओरडावे 'अगं ए, रात्री भाकरी कर बरं का...' थोड्या वेळात भाकरी तयार असते! ( हा आज्ञाधारकपणा नेहमीच असतो असे नाही, पण बऱ्याच वेळा असतो!)