स्वारगेटला एक माणूस (मा. १) मुंबईच्या गाडीची वाट पाहात उभा असतो तो बाजुला उभ्या असलेल्या माणसाशी (मा. २) खालील संवाद करतो:
मा. १: काय हो मुंबईला चाललाय का?
मा. २: होय
मा. १: कुठे ठाकऱ्यांकडे वाटत?
मा. २: छे हो!
मा. १: मग कोण मनोहर जोशी, सरपोतदार, वगैरे शिवसेनेच्या नेत्यांशी बोलायला?
मा. २: नाही हो!
मा. १: आपण शिवसेनेच्या कुठल्या "शाखा क्रं" मधे असता?
मा. २: नाही हो कुठल्याच नाही?
मा. १: नाही? मग कुठल्या नेत्याशीही संबंध नाही?
मा. २: अजिबात नाही माझा आणि शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही? तुम्ही मला मगासपासून सारखे का विचारता आहात?
मा. १: नाही, मग जरा तुमचा पाय माझ्या पायावरून बाजूला करा की!