घरातील कुटुंबियांमधे भांडणे होतात म्हणून बाहेरुन चोर दरोडेखोर आले आणि त्यांनी चोरी केली तर तक्रार करणे चूक हे आपणाला तर्कशुद्ध वाटते का? मला वाटत नाही.
सदर चोर हे आपल्या घरात (ज्याला तुम्ही घर म्हणता ते) राहत होते. ते तिथे गेली शेकडो वर्षे राहत आहेत व तुमची घराची संकल्पना उणिपूरी ५०-५५ वर्षांची आहे.
इथे प्रेम व मालकी यांमध्ये काहीतरी गफलत होत आहे असे मला वाटते.
या संदर्भात एक चीनी म्हण मार्गदर्शक ठरेल : जर तुमचं एखाद्या गोष्टीवर खरोखरचे प्रेम असेल तर त्या गोष्टीला मोकळे सोडा. जर ती तुमच्या कडे परतली तर तुमचीच आहे आणि जर परतली नाही तर ती तुमची नव्हतीच कधी.
तर नागालँड, मणीपूर, आसाम, त्रिपुरा ही मंडळी, कदाचित तमिळनाडूही वेगळे होण्याच्या बाता करु लागेल.
जर त्यांना वेगळे होण्यात स्वत:चे भले आहे असे वाटत असेल तर तो दोष कुणाचा? आणि या तुमच्या भारतावर तुमच्या इतकाच त्यांचाही अधिकार आहे तेव्हा त्यांना वेगळे होण्यापासून रोखणारे आपण कोण?
राहिले काश्मीर प्रेमी.. हे प्रेम म्हणजे नक्की काय ते समजू शकेल का? व त्यासाठी काश्मीर भारतातच राहणे गरजेचे आहे काय? काश्मीर तुमचे असण्यापेक्ष्या काश्मीरी जनतेचे असणे गैर आहे काय?
मी आशुतोष