ऑम्लेट घालायच्या आधी तवा मंद आचेवर व्यवस्थित तापवून घेणे. तवा व्यवस्थित तापला आहे का नाही हे पाहण्यासाठी २-३ थेंब पाणी तव्यावर टाकून पहाणे. चुर्र असा आवाज आला की तवा तापला आहे असे समजावे. ऑम्लेट घालून झाल्यावर १०-१२ सेकंदाने त्यावर व ऑम्लेटच्या कडेने तेल सोडणे म्हणजे चिकटत नाही.