नरेंद्र गोळे, तुमचे विचार योग्य आहेत. आपल्या आजोबाजूला होणाऱ्या प्रदूषणाची काळजी आपणच करायची असते. मी स्वतः कधीही फटाके उडवत नाही, लहान असतानाही एखाद-दोन वर्षी सोडले तर कधी फटाके उडवले नाहीत. आपल्या वाहनांची नियमित तपासणी करून घेणे, ती खरोखरच केली आहे ना हेही पहायला पाहिजे. नाहीतर वेळ नाही, रांगेत कोण उभं राहील वगैरे सबबींखाली केवळ पैसे देऊन स्टिकर मिळवला जातो. झाडे लावण्याचे प्रमाणही वाढायला हवे.