शिवश्रीभाऊ,

तुम्ही मनोगतावर शिवधर्माचा प्रचार करता, ते लोकांनी वाचावे, त्यावर चर्चा करावी अशी अपेक्षा करता (तुम्ही बरेचदा लेखन चर्चाविभागात करता, म्हणजे लोकांनी त्यावर चर्चा करणे तुम्हाला अपेक्षित असणारच), अधूनमधून कविता लिहिता, त्यावरही अनेक तुम्हाला प्रतिसाद/प्रतिक्रिया देतात. मात्र तुम्ही कधी इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देत नाही, असे का? इतरांचे लेखन तुम्ही वाचतच नाही की वाचूनही प्रतिसाद देण्याची तसदी घेत नाही? इतरांचे लेखन तुम्ही वाचतच नसाल, तर शिवधर्माच्या प्रचारासाठीच केवळ तुम्ही मनोगतावर येता काय?

विषयांतराबद्दल क्षमस्व. मात्र तुम्हाला तुमचे लेख, चर्चा व कविता यांना आलेल्या प्रतिक्रियांव्यतिरिक्त मनोगतींच्या इतर लेखनावर काहीच लिहिण्याची इच्छा होत नसेल, तर मनोगतावर शिवधर्माचा प्रचार करण्यासाठीच केवळ येणे किती योग्य आहे?