लेख आवडला.
मृत्यू पावणारे आणि व्याधींनी ग्रस्त लोक बघून; 'दु:ख निर्माणच का केलंस ?' असा जाब ईश्वराला विचारावा म्हणून ईश्वराच्या शोधात युवराज गौतम सगळे राजभोग मागे टाकून निघाला, तो निरीश्वरवादी बुद्ध म्हणून मान्यता पावला.
एक क्षुद्र उंदीर देवासाठी म्हणून केलेला प्रसाद त्याच्याच पिंडीवर बसून खातो आणि तिथेच घाण करतो; या करिता देव त्या उंदराला काही शिक्षा करीत नाही असा कसा देव? देव अस्तित्वातच नाही, देव धर्म या भाकड कथा आहेत, अशी समजूत होवून नरेंद्र घर सोडून पळाला, तो ईश्वरवादी हिंदू धर्माचा प्रतिनिधी स्वामी विवेकानंद म्हणून नावाजला. इतकेच नाही तर शिकागोच्या त्या प्रसिद्ध मेळाव्यात देव न मानणाऱ्या बुद्धाला देव मानतो अशी कबुली दिली.