हे ग्रंथ विकले जातात हे मला पटत नाही. मी कधीच हे ग्रंथ कुणाच्या घरी, एखाद्या दर्जेदार दुकानात किंवा एखाद्या प्रदर्शनात पाहिलेले नाहीत. एखाद्या वाचनाचा जबरदस्त व्यासंग असलेल्या व्यक्तीकडूनही मी कधी या ग्रंथांचे नाव ऐकलेले नाही. जसे पु. ल. देशपांडेंचे "व्यक्ती आणि वल्ली" किंवा सुरेश भटांचे "रंग माझा वेगळा" किंवा शिवाजी सावंतांचे "मृत्युंजय" किंवा जुन्या काळच्या बखरी ही पुस्तके जगप्रसिद्ध आहेत, सगळ्यांना ठाऊक आहेत तसे या पुस्तकांच्या बाबतीत घडले किंवा घडेल असे मला वाटत नाही. मुळात आपल्या-आपल्यातच दुही निर्माण करणारे, खोडसाळपणाचे लिखाण करून ते प्रकाशित करणे यामुळे काही साध्य होत असेल असे मला वाटत नाही. इतकी शतके लोटली शिवाजी महाराजांचा काळ जाऊन आणि आताच हे कसे उमगले की उच्चवर्णीयांनी सोयीचा इतिहास लिहिला? की या भावना भडकावून सोयीचे राजकारण केले जात आहे? आणि शिवाजी महाराज, भोसले घराणे उच्चवर्णीय नव्हते? उलट ब्राह्मण (पेशवाई वगळता) नेहमीच जनता जनार्दन राहिले आहेत आणि मराठे राज्यकर्ते राहिलेले आहेत. ही परंपरा अजूनही सुरु आहे. शिवाजी महाराजांपासून तर यशवंत चव्हाण आणि अगदी विलास देशमुख आणि शरद पवार यांच्यापर्यंत सत्ता मराठ्यांच्याच हातात राहिली आहे. मग त्यांना इतिहास लिहिला गेला तेंव्हा कळला नाही? की त्यांना लिहिता वाचता येत नव्हते? आणि सोयीचा इतिहास लिहिला गेला असता तर त्यात शिवाजी महाराजांना, मावळ्यांना इतके सकारात्मक महत्त्व का दिले गेले असते? शिवाजी महाराजांना देवत्व का बहाल केलं असतं इतिहासकर्त्यांनी? त्याऐवजी सरळ दादोजी आणि समर्थ रामदास यांनाच हीरो करणे इतिहास कर्त्यांना शक्य झाले नसते का? इतिहास लिहिणाऱ्यांनी बरोबर इतिहास लिहिला म्हणूनच शिवाजी महाराजांपुढे अवघा महाराष्ट्र आणि देश नतमस्तक होतो ना? या गोष्टींचा विचार या फुटीरतावादी लेखकांना करता येत नाही? की त्यांना ही लिहिता-वाचता येत नाही? इतक्या शतकांनी असले लिखाण करून सिद्ध काय करायचयं या लेखकांना? त्यामुळे काही फरक पडणार आहे का? इतिहास बदलणार आहे का? एवढा साधा विचारही या मूर्खांना करता येत नाही? आता जगासमोरचे, देशासमोरचे, मराठी समाजासमोरचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या कोणत्या, त्या कशा सोडविता येतील, मराठी समाज एकत्र येऊन पुढे कसा जाईल, जीवनमान कसे सुधारता येईल, एकंदरीत संपूर्ण विकास कसा साधता येईल, अगदी तळा-गाळापर्यंत शिक्षण, समृद्धी आणि सुबत्ता कशी पोहोचवता येईल हे विधायक विचार करायचे की असले निरुपयोगी आणि प्रक्षोभक लेखन करायचे? अकलेचे कांदे आहेत, दुसरं काही नाही!
त्यांना लिहू दे इतिहास. बघू त्यांचा "इतिहास" कोण वाचतं ते! कुणीही आंडू-पांडू इतिहास नसतात लिहू शकत.
--समीर