भारताने जनमत घेतले नाही व हरिसिंगाबरोबर केलेल्या कराराचा भंग केला आणि काश्मिरला आपल्या ताब्यात ठेवले. एकप्रकारे काश्मिरी जनतेचा विश्वासघात केला.
पंकजराव, पी टीव्ही ने तुम्हाला हे कदाचित सांगितले नसेल की, भारताने युनोला दिलेले जनमताचे आश्वासन हे कलम ६ अंतर्गत होते. कलम ६ हे शिफारसवजा असते आणि त्याचे निर्णय हे बंधनकारक नसतात. (कलम ७ चे मात्र बंधनकारक असतात).
अर्थात ही एक पळवाटच आहे. आणि बहुसंख्य काश्मिरी जनतेचा त्यमुळे विश्वासघातच झाला. हे मला मान्य आहे.
भारत सैन्याच्या जोरावर त्याना ताब्यात ठेवू पाहत आहे.
मान्य.
मात्र काश्मिरी जनता आपल्या सोबत आहे.
म्हणजे नक्की कोणाच्या सोबत ??
भारतीय सैन्याकडून दररोज हजारो तरुणांचा बळी घेतला जातो, तरुणींवर, वृध्दांवर अत्याचार केला जातो.
मान्य. गेल्या नोव्हेंबरमध्ये मी श्रीनगरला असतानाच संध्याकाळी बातमी आली - मेजरच्या हुद्द्यावरील एका भारतीय अधिकार्याने एका १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. दुसर्या दिवशी श्रीनगर पूर्णपणे बंद होते. ४ पेक्षा जास्त लोकांना एकावेळी जाता येत नव्हते. स्थानिक वर्तमानपत्रात जळ्जळीत अग्रलेख आले होते. आमच्या हॉटेलातील कर्मचारीवर्गदेखिल अस्वस्थ दिसत होता.