घटस्फोट योग्य की अयोग्य हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही लिहिली आहेत ती कारणे तर आहेतच. त्याच सोबत सामाजिक भीती हे सुद्धा एक कारण आहे.
शहरांमध्ये प्रमाण जास्त आहे. पण गावांमध्ये शक्यता धूसरच. माझ्या वाचना नुसार काही वर्षांपूर्वी पुण्यात रोज ३०० अर्ज सादर होतात. हे बोलके उदाहरण आहे.
अनेकदा बदनामी पोटी मानसिक कुचंबणा सहन केली जाते. आपल्याकडे अपयशाला नको इतके हीन समजले जाते. घटस्फोट हा आयुष्य समजुतीने न जगता येण्याचे अपयश मानले जाते अन ते आपण का ओढवून घ्यायचे? हा एक विचार असतो.
घटस्फोटीत स्त्रिया जास्त बदनाम असतात हा सर्वात मोठा गैर समज.
एकूणच कायदा आणि तो कायदा करणारा समाज यांनी घटस्फोटाला नको इतके भयाण रूप दिले आहे.