चाणक्यसाहेब,"पण त्यावरून त्यांना पुणेकर अशी शिवी हासडणे योग्य वाटत नाही." इथे स्वाती दिनेश यांनी 'पुणेकर' अशी 'शिवी हासडली आहे' असे वाटत नाही.

मालकाचा किसा नमुनेदार आहे,जर्मन मंडळी नमुनेदार आहेतच.त्यांच्या नमुनेदारपणाची तुलना पुण्यातल्या दुकानदारांशीच होऊ शकेल ...

मी जर्मनीत असताना काही असे नमुने मी ही पाहिले आहेत; एकदा मी एक 'एक्स्टेंन्शन बोर्ड' आणला,तो 'डिफेक्टीव' आहे असे मला जेव्हा तो चालेना तेव्हा घरी आणल्यावर समजले तेव्हा मी परत दुकानात गेलो आणि बोर्ड बदलून घेतला.विक्रेत्याला म्हणालो,अरे बाबा,हा इथे टेस्ट करुन दे.त्यावर त्याचे उत्त्तर होते,"इथे नाही टेस्ट करून मिळणार,घरी टेस्टींग करा,नाही चालला तर परत आणा.."वास्तविक ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्ठे दुकान आहे,तिथे हा बोर्ड चालतो कि नाही हे पहायला काही कठीण नव्हते.

अर्थात सगळेच जर्मन असे नसतात.{पण सगळे पुणेरी दुकानदार तरी कुठे असे असतात?}असो.

लेख छान आहे.

बन्याबापू