*कुणी खालच्या जातीतील व्यक्ती जर का शंकराचार्य बनण्यास उत्सुक असेल तर त्याला शंकराचार्य होता येईल का?

** सहमत ,अस व्हायला हव. हिंदू एक जिवन पद्धती आहे हे मान्य केल तर ते शक्य आहे‌. भारतातील तमाम मंदीराचे ट्रस्ट व पुजारी वर्ग पासून ते शंकराचार्य पद संस्कृतच्या अटीवर नव्हे संस्कृतीच्या आधारावर ठेउन पददलित समाजाच्या व्यक्तिंकडे देऊन बदला. तसे होत नसेल तर समांतर शंकराचार्य मठांची स्थापना करा व सध्याच्या शंकराचार्यांना बरखास्त करा. हे व्हायलाच हवे.

**आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तिंकरिता भारत देशात त्यांना आवडेल त्या गावात विवाहा नंतर १० वर्षे पर्यंत मोफत निवास पुरवा.किमान २० लाखरुपयें प्रती कुटुंब व्यावसायांकरिताअ भाग भांडवल मोफत द्या.

**भारतीय राज्यातील सर्व मुख्यमंत्रिपदे, अर्धी मंत्रिपदे, सर्व राज्यपालपदे,महानगरपालिकांच्या स्थायीसमितीची अध्यक्षपदे,  राखिव करा.

**अराखिव राजकारण्यांना २च्यावर वेळा लोकसभा व विधान सभेत जाण्या पासून कायद्याने वंचित करा. 

** शेअर बाजारात येणारे शेअर इश्यु ३०% दलित समाजा करिता राखिव करा.

** भारतातील सर्व कमर्शिअल कॉम्प्लेक्स पैकि ३०% जागा दलितांना मोफत द्या.

 

 

मला विश्वास आहे सुधारणा वादी मनोगती आमच्या जाहिरनाम्यास पाठींबा देतील.आणि अशा काही क्रांती कारी योजना सादर करतील असे वाटते.

पा.पा.