वायुप्रदुषण आणि ध्वनिप्रदूषण कमी होणे ही निकडीची बाब असल्याचे बहुतेक लोकांना माहिती आहे असा अंदाज बांधायला हरकत नसावी. परंतु, 'मी'च काय तो शहाणा, माझ्याकडून काहीच प्रदूषण होत नाही, दुसऱ्या लोकांनी मात्र आता शहाणे व्हायची गरज आहे - या प्रवृत्तीमुळे या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले दिसते.
'मला' जे जे काही करणे शक्य आहे ते मी करीनच असे ठरवून स्वतः पासूनच सुरुवात केल्यास प्रदूषणाला अटकाव करणे शक्य आहे.
डासनिर्मूलनासाठी शासन किंवा इतर संस्थांकडून सतत माहिती सांगितली जाते, परंतु किती 'सुशिक्षित' जनता ही माहिती वाचते किंवा त्यातील पटण्याजोग्या व करण्याजोग्या गोष्टी अमलात आणते?
शेजाऱ्यांच्या घरी शिवाजी जन्म घेईल आणि मग आपण सुखाने जगू ही कल्पना सोडून देऊन आपण आपल्यापासूनच सुरुवात करूयात. स्वतःला प्रदूषणाचा खूप त्रास होतो हे माहिती असेल तर निदान ते प्रदूषण रोखण्यासाठी मी स्वतः काय करीत आहे हा प्रश्न मनाला विचारून त्या अनुरोधाने चांगल्या नागरिकाचे कर्तव्य तरी पार पाडूयात.
मी माझ्यापासून सुरुवात केली आहे.
~ संदीप.