आजही कुणी विद्रोही अथवा कुणी आंबेडकरी जेव्हा हिंदू धर्मातील चुकांवर बोट ठेवतो
प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मात कशा चुका आहेत आणि आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हेच दाखवून देत असतो. त्यामुळे हिंदू धर्मातील चुकांवर कोणी बोट ठेवले तर सर्वसामान्य हिंदूंकडून त्याला विरोध होणे साहजिक आहे. हेच अगदी ख्रिश्चन, इस्लाम इ. धर्मांबाबत लागू होते. पण त्याविषयी मात्र आपल्याला कधीच आक्षेप नसतो. बर तुम्ही इतका अन्याय सहन केला आहे त्यामुळे अन्याय म्हणजे काय हे तुम्हाला चांगले कळते. मग तीच चूक तुम्ही का करू पाहता आणि पुन्हा त्याचे समर्थन 'इतके वर्ष त्यांनी आमच्यवर अन्याय केला आता आमची पाळी आहे आता आम्ही बघून घेऊ, त्यांना भोगू देत' अशा भाषेने केले जाते ? आंबेडकरांची शिकवण निश्चितच अशी नसावी.
आणि कुणाला उच्चवर्णीय म्हणून त्याच्या विषयी संताप व्यक्त करतो तेंव्हा काय होतं?
याला सारासार विचार न करणे असे म्हणतात. केवळ 'उच्चवर्णीय' म्हणून तो संतापाला पात्र होतो ? तो तुमच्याशी अगदी खरोखरीच्या मित्रत्वाने वागत असतानाही ? अशा वागण्याला विरोध होणारच.
प्रतिक्रिया १) आम्ही नाही तसं वागत. उलट आम्ही तर त्यांना आमच्यातील जेवण देतो. (उपकार मायबाप!)
यालाच मी दुटप्पी वागणे म्हणते. दिले तरी लाथा आणि न दिले तरी बुक्क्या. या विद्रोह्यांना नेमके काय हवे आहे ? चांगले वागले तरी तुम्ही त्याकडे हिणकस वृत्तीनेच पाहणार असाल तर मग तथाकथित उच्चवर्णीय तुमच्याशी कितीही चांगले वागले तरी तुमच्या विचारात कधीही काहीच सुधारणा होणार नाही. आणि तुम्ही सतत आमच्यावर अन्याय होतो अशा बोंबा मारत राहणार.
- यात कुठेही ते(मागचे) चुकलेत आणि यांनी मागच्या काळात खूप अन्याय सहन केला याची बोच नसते. किमानपक्षी यांनी तरी त्यांना समान मानावं अशी अपेक्षा करावं तर तेही नाही.
असा निष्कर्ष आपणच काढलेला असतो.
येथे आम्ही तर त्यांच्याशी 'असं' वागतो. (बघा आम्ही किती मोठ्या(?) मनाचे.) असं बोलल्या जातं.
कारण होणाऱ्या सुधारणांकडे 'सोयिस्कर' डोळेझाक करत हे लोक फक्त दुसऱ्याला नावेच ठेवत असतात अशा वेळी तोंड उचकटून बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. आणि तसे केले तरीही ते तुम्हाला आवडत नाही. कारण यात तुमच्यावर उपकार केले गेले आहेत असे तुम्हाला वाटत राहते. तुमच्यात कोणत्याही प्रकारचा समजुतदारपणा नसतो.
म्हणजेच आजही समानता मनात नाहीच. दुर्दैव काय की आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊनही ही जात काही सुटत नाही.
जर अजूनही समानता नसती तर 'त्या' जातीचे लोक सर्वोच्च पातळीवर जाऊनच दिले गेले नसते. पूर्वी जशी गळचेपी होत होती तशीच आजही झाली असती. पण हे मुद्दामच विसरले जाते. आणि त्याबद्दल कोणी एक अक्षरही बोलत नाही.
आपल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन करणारे श्री नरेंद्र जाधव यांनाही लोक 'त्या' जातीचा असं म्हणतात. असं खुद्द त्यांचा अनुभव आहे.
'त्या' जातीचा असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा खरे तर त्यांना आणि 'त्या' जातीतील समस्त लोकांना अभिमान वाटायला पाहिजे की आम्हीही तथाकथित उच्चवर्णीयांपेक्षा कमी नाही (अर्थातच पूर्वापार चालत आलेल्या वर्चस्वाला आव्हान दिल्याबद्दल). पण 'त्या' जातीतल्या किती लोकांना नरेन्द्र जाधव माहीत आहेत याचा शोध घेतला तरी पुरे !
आज आमच्या पिढीला जात-पात, कर्म-कांड, भेदभाव नको असतानाही तुम्ही मात्र इतिहासातून बाहेर पडायचे नावच घेत नाही. आणि केवळ स्वतःच्या पूर्वग्रहांवर आधारीत समज करून घेतले जातात, लोकांना भडकविले जाते.
यांच्या पूर्वजांनी कमावलेली सर्व जमीन आणि संपत्ती मात्र यांच्या कडेच ठेवा.
मला वाटते कूळ कायद्यामधे बऱ्याच लोकांना न्याय मिळाला आहे. आणि कूळ कायद्याचा गैरवापरही किती केला गेला आहे याची आपण माहिती काढलीत तर बरे होईल. ज्यावेळी आपण 'कमावलेली' जमीन/संपत्ती असा उल्लेख करता त्यावेळी ती संपत्ती ओरबाडून दुसऱ्या कोणाला दिली जावी अशी आपली इच्छा का ? अंबानींकडे कोट्यावधी संपत्ती आहे म्हणून ती त्यांच्याकडे राहताच कामा नये काय ?
आजही भारतातील संपत्तीचे वितरण पाहता २० % (तथाकथित) उच्चवर्णीय जातींकडे ८०% संपत्तीचं एकत्रीकरण दिसेल. आजही निम्न वर्गीय जातींचा संघर्ष किमान जीवनमान दर्जा मिळवण्यासाठीच आहे. मात्र हे सोयिस्कर रित्या विसरलं जातं.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ८०% संपत्ती जर उच्चवर्णीयांकडे असेल तर उरलेली २०% संपत्ती निम्नवर्णीयांकडे आहे असे समजू.
आता जी २०% टक्के संपत्ती निम्नवर्णीयांकडे आहे ती निम्नवर्णीयांकडे असलेली १००% टक्के संपत्ती आहे. तर एकूण १००% (२०%) संपत्ती १००%(८०%) टक्के निम्नवर्णीयांच्या किती टक्के लोकांकडे आहे. तुमच्या लक्षात येईल की त्या संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा हा अगदी थोड्याच निम्नवर्णीयांकडे आहे. असे का झाले ? ती संपत्ती सर्वांमधे समान का वाटली गेली नाही ?
पुन्हा आपल्या उच्चवर्णीयांतही कित्येक लोक किमान जीवनमान दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. थोडक्यात भारताच्या लोकसंख्येच्या २०% उच्चवर्णीय असतील तर त्यातील सगळेच उच्चवर्णीय संपत्ती बाळगून नाहीत. म्हणजे आपण जे काही विधान केलेत ते अर्धसत्य ठरत नाही का ? केवळ उच्चवर्णीयांतील किती टक्के लोक संपत्तीचा मोठा बाळगून आहेत हे स्पष्ट झाले तर बरे होईल.
बर पुन्हा आपण म्हणता त्याप्रमाणे जर उच्चवर्णीयांच्या पूर्वजांनी ती संपत्ती गोळा केली असेल तर यात तुम्ही आजच्या उच्चवर्णीयांना दोषी कसे काय धरू शकता ? असा प्रश्न विचारलेलाही तुम्हाला आवडत नाही.
एकंदरीत मला असे वाटायला लागले आहे की तुमच्या पूर्वजांना 'जात' नकोशी वाटत होती पण आजच्या काळात मात्र तुम्हाला 'जात' हवीशी आहे कारण त्याचे भांडवल करणे सोपे असते. मुळात ज्या कारणासाठी हिंदू धर्माचा तुम्हाला राग आहे तो धर्म सोडून बुद्ध झाल्यावरही तुम्हाला आरक्षणे हवी आहेत. मग धर्म सोडण्याचा देखावा कशासाठी ? धर्म सोडल्यावरही तुम्ही हिंदू जातीचा फायदा का घेऊ इच्छिता ?? आता मला सांगा जात कोणाला सोडवत नाहीये ?