अदिती, एव्हढ्या मोठ्या गोष्टीचे नेटाने भाषांतर केल्याबद्दल कौतुक वाटले.

काही किरकोळ सुधारणा सुचवाव्याशा वाटतात:
शिंगरू -> तट्टू
माझी कीर्ती अजून तुमच्या कानावर -> माझ्याबद्दल अजून तुम्ही ऐकलेलं दिसत नाही.
जेम्सला धोका होणार होता -> जेम्सच्या जिवाला धोका ..
वगैरे.. काही ठिकाणी भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे की काय असेही वाटले.

कौतुकाची एकच ओळ व सुधारणेच्या पाच ओळी असे पाहून खट्टू होऊ नये. :-)भाषांतर उत्तम आहे; पुढच्यावेळी आणखी उत्कृष्ट व्हावे या हेतूने सुचवण्या दिल्या आहेत.