शिवधर्माच्या प्रचारासाठीच केवळ तुम्ही मनोगतावर येता काय?
याचे उत्तर होय असेच असावे तेव्हा या प्रश्नावर सहमत.
मनोगतावर शिवधर्माचा प्रचार करण्यासाठीच केवळ येणे किती योग्य आहे?
येऊ देत की. त्याशिवाय त्यांच्या धर्मात काय चालतं हे कसं कळायचं? जाता का तुम्ही आपणहून शिवधर्माच्या संकेतस्थळावर? मी तरी नाही जात. तेव्हा करू देतच प्रचार, त्याचा समाचार घ्यायला इतरांना मजाच येत असावी.
कधीतरी मात्र, अशा गोष्टी साफ दुर्लक्ष करण्यासारख्या असताना आपणच त्याच महत्त्व वाढवत असतो असेही वाटते.
त्यातून या संकेतस्थळाचे नाव 'मनोगत' असल्याने आपले मनोगत शिवश्रींना मांडायची मुभा आहेच. ;-) आणि योग्य निर्णय घ्यायला प्रशासन समर्थ आहे.