जेम्सला धोका या एकाच शब्दाबद्दल लिहावंसं वाटतंय. इथे जेम्सला धोका याचा अर्थ त्याच्या प्रतिष्ठेला, त्याच्या निर्दोषपणाला धोका असा अर्थ अपेक्षित आहे. जेम्सने खून केलेला नाही त्यामुळे त्याला देहदंड होणार नाही पण त्याला तुरुंगात जावं लागलं तरी त्याच्या वडिलांच्या हृदयाला अतिशय वेदना होतील असं वाटलं म्हणून जेम्सला धोका असा शब्दप्रयोग वापरला. आणि धोका असाच शब्द वापरला दगाफटका असा नाही.
बाकी शब्दांबद्दल सांगितलेस हे खूप चांगले आहे. मी पुन्हा एकदा तपासून पाहीन आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.

--अदिती