मग लग्नबंधनातून सुटू पहाणारे यदृच्छया त्यातून सुटतील.पण असे होणे योग्य ठरेल का?

एखादे बंधन काचू लागले तर त्यातून मोकळे होणे केव्हाही चांगले.

घटस्फोटासंदर्भात पडती बाजू अशी मांडली जाते की त्या जोडप्याच्या मुलांचे मात्र हाल होणार. सतत भांडणारे, किंवा रडारड करणारे, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असे आईवडील असतील तरीही मुलांचे हाल होणारच असे मला वाटते. तेव्हा लग्न करतानाच विचारपूर्वक करायला हवे. हे एकदा लक्षात आले की लग्नावरचा सामाजिक भर कमी होईल असे मला वाटते. हे एका परीने पाश्चात्यीकरणच आहे. आणि ते टाळता येण्यासारखे नाही. (मला तरी ते टाळावे असे वाटतही नाही.)

वाढत्या घटस्फोटाचे आणखी एक कारण स्वावलंबी स्त्रिया हेही असावे. पूर्वी किचकट कायदे आणि आर्थिक अवलंबिता यामुळे स्त्रिया तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करून घेत असाव्यात. आता पोटगी नाही मिळाली तरी फरक पडत नाही, असे म्हणून घटस्फोट घेण्याच्या घटना वाढत असाव्यात.